सावलीला पदर
कडेवर पोर
घामाच्या धारा
सोबतीला
संपलेल्या शिधांची
मोकळीच बोचकी
काटक्यांची चूल
पेटलेली
भुकेच्या आगीला
पाण्याचा आसरा
तुटक्या पायताणातून
जाळतो निखारा
तरी ही ओढ
पोहचण्याची गावा
घेऊन आयुष्याचा
उध्वस्त पसारा

©️ShashikantDudhgaonkar