बसून बसून
सुजलेत गुढगे
झोपून झोपून
भनाणलय डोस्के

टिव्ही बघून
बघायचा किती
बागेला पाणी
ओतायच किती

झोपेत सुध्दा
चावळतात हात
सावरायला
नाकावरचा मास्क

सगळ्याची नाक
वाटतात चपटी
कानाची तर केंव्हाच
झालीय खुंठी.

पण आजकाल मला
जरा वेगळीच भीती
उगवली असेल
का मागे शेपटी.

©️shashikantdudhgaonkar