बालक्नीत जेंव्हा आली ती
मोकळे सोडून सारे केस
ओल्या केसांनी झटकता मान
चिंब भिजले माझे मन

हसून पाहता वळून मी
लाजून गेली पळून आत
घालमेल झाली, उरी धडघड
मोहरून गेले माझे मन

क्षणात उगवला चंद्र जणू
तारका दिसू लागल्या मनी
मंद सुगंध दरवळलेला तो
आठवतो मज क्षणोक्षणी

©️shashidudhgaonkar