चाहूल तिची
येता कळ्याना
उमलू लागे
सारी फुले
ती फुलवेडी
ती फुलराणी
निशीगंधाची
गोड कळी

झुळूक हवेची
रातराणीची
येतां दरवळे
चोहीकडे
गालावरती
गुलाब हसती
ओठावरती
सदाफुली

फुलात लपते
फुलात रमते
फुले पाहता
ती मोहरते
ती फुलवेडी
ती फुलराणी
निशीगंधाची
गोड कळी


©️ShashikantDudhgaonkar