चिंचोळ्या वाटेवर
चालतो धुक्यात
दरी दोन्ही बाजूला
प्रवास अंधारात

अंधार्या दुःखाला
अंधारीच वाट
हुंदक्याना ही भीती
कोसळून पडायची

भीतीला ही वाटे भीती
दुःखाला ही दुःख
त्या अंधार्या वाटेचा
मी शोधतो अंत

©️ShashikantDudhgaonkar