लावत होतो दिवे
अंधार काढण्यासाठी
गेले विझून माझे
दिप पेटण्या आधी

वातीतून धुराच्या
नागमोड्या रेषां
खिजवून गेल्या अलगद
हवेत विरता विरता

भरल्या तेलात बुडल्या
माझ्या कोरड्या वाती
हसून झुळूक हवेची
विझवून आग गेली

©️ShashikantDudhgaonkar