मंद धुंद रात्री
जाग अचानक आली
एकटे पणाची
जाणिव देत गेली

जागे नव्हते कोणी
ऐका बोलावयला
स्तब्ध हवा श्वासाची
जाणिव देत गेली

निशब्द अंधार काळा
घुसमटवून जीव गेला
अर्ध्या स्वप्नांची पहीलेल्या
जाणिव देत गेला

कौला मधुन कवडसे
आज एक ही न आले
रात्र अमावसेची
जाणिव देत गेले

©️ShashikantDudhgaonkar