मीच अखेर सावरतो
माझ्या स्वत:ला
आवरतो विखूरलेल्या
मनाची कस्पटे

टोचणारे बोचणारे
तोडणारे मोडणारे
वाटेत आपल्याला
असंख्य भेटतात
काही आपल्या बरोबरच
चालत ही असतात

कधी वाटते धरावी
वाट वेगळी
सोडावी कास
अन आस सुखाची
पण प्रवास मात्र जवळ जवळ
संपतच आलाय
होईल सुरू रात्र
कधी ही अंधारी
अन ओरबाडणारे थांबतील
कदाचित अंधारात तरी

©️ShashikantDudhgaonkar