कधी असतेस पाऊस
कधी होतेस तुफान
कधी करतेस वीजां सांरखा
रौद्र कडकडाट

कधी नुसतीच ढगाळ
अंधारलेले आकाश
तर कधी असतेस प्रखर
टोचणारा प्रकाश

कधी असतेस बोचरी
थंडगार हवा
तर कधी पुनवेचा
शितल चंद्रमा

रूप खरे कधीतरी
तुझेच दिसू दे
गालावरती निरागस
हसू येऊ दे

नको फवारे शब्दांचे
नको अलंकार
क्षण अबोल मायेचे
पुरे दोन चार

©️ShashikantDudhgaonkar