सांयकाळी बसले होते

आपल्याच तंद्रीत

तल्लीन झालेले

अंतराळविश्वात

सोबतीला एक ग्लास

खास ठेवणीतला

रिकामी बाटली

सोफ्यावर लवंडलेली

प्लास्टीकच्या प्लेटीतले

कुसकरलेले पापड

चुरगळलेलला सदरा

हिरमुसलेली विजार

उगाच हाताने

कुरवाळणे केसांना

असलेल्या नसलेल्या

मधेच गालावर

फिरवणे हात

अन हसणे खुदकन

आपल्याच विनोदावर

अचानक आठवलेल्या

येवढ्यात आतून

येतो आवाज

आतून म्हणजे

स्वयंपाकघरातून

बस झाल आता

आणि घ्या गिळून

काय हसतां भिंतींकडे

बघून बघून

झोपा एकदाचे

टेकवा पाठ

अन छताकडे पहा

गपगुमान

©️ShashikantDudhgaonkar