वडाच्या पारंब्या

स्वत:ला आवडणारे पटणारे

नितीमुल्ये रितभातीतच्या चाळणीत

बसणारे न बसणारे

खरच करतो का काही आपण

का फसवतच असतो स्वत:ला

आपण रोजच्या रोज

मुखवटे चढवून शिरतो भुमीकेत

स्वत:ला विसरून पुर्णपणे

आणि दिसले जर चेहरे सभोवताल

मुखवट्यावाचून फिरणारे

मुखवट्याच्या आतच कुढत राहतो आपण

घेतो बांधून वडाच्या झाडासारखे

पारंब्या सोडून ढीगभर

मग बघत राहतो आकाशात

ढगांकडे पक्षांकडे आशाळभूतपणे

पण मातीत रूजलेल्या अनेक पारंब्या

आणतात परत जागेवर

ठेवतात तिथेच आपल्याला

कायमचे कुढत

©️ShashikantDudhgaonkar