
मुंबई स्पिरीट
गुढरम्य अर्थ त्यांच्या
जगण्याच्या धडपडीत
आणि मरणासन्न जगण्यात
चैतन्य शोधणारे
अपरिहार्यतेला त्यांच्या
जिद्द म्हणणारे
सहनशिलतेला त्यांच्या
देवत्व देणारे
कोसळलेल्या घरा बाहेर
मेलेल्या मढ्यावर
भेसूर रडण्यातही शोधतात
दुर्दम्य आशावाद
©️ShashikantDudhgaonkar
Very true and this spirit is nowhere in the world
LikeLike
Chhan.
LikeLiked by 1 person