रूळलेल्या वाटा

रूळावरच्या रूळलेल्या वाटा

तेच थांबे तोच फाटा

तेच बघणे त्याच खिडक्यातून

त्याच मोक्याच्या जागेवरून

अट्टाहासाने अडवलेल्या

हे नाही तर, ते ही नाही

असे नाही तर, तसेही नाही

सवय परिपाठ समजूती भिंती

मनाभोवती बांधलेल्या

रुळांवरून खाचखळग्यात

कधीतरी उतरेल वाट

कदाचीत एकाद्या

नव्या जगात

तोल साधत स्वार व्हायचे

धुंद होऊन वारे झेलायचे

का फरफटत जायचे

मागे मागे

कण्हत विव्हळत रडतखडत

आपल्याच विणलेल्या कोशात

©️ShashikantDudhgaonkar