पानगळ

पडू लागली ओली पावले

आभाळातून धारांची

नाजूक नक्षी मातीवरती

उठू लागली थेंबांची

ओली माती हिरवी पाती

लहान मोठी गोल लांबोळी

नाचू लागली सारी पाने

थेंब थेंबांच्या ठेक्याने

हरकून गेली झाडेझुडूपे

स्तब्ध निशब्द व्रूक्ष झाले

ओढून बुरखा धारांचा

भिजू लागले रस्ते सारे

ओघळ धारा वाहू लागल्या

फुटेल त्याना वाट जिथे

नवजन्माच्या आनंदाने

सुचे न त्याना जाऊ कुठे

अन उल्हासाने घेऊन गेले

ग्रिष्मामधे टाकलेली

गतवर्षाची पानगळ

©️ShashikantDudhgaonkar