
आत्ममग्न
भाव डोळ्यातले
कधी न कळले
ना शब्दावाचून
वळले काही
अबोल त्यांची
माया मजला
कधी न कळली
उमगली नाही
असणेही त्यांचे
माझ्यासाठीच
समजूत माझी
मी केली
इतकी की मी
प्रतीसाद त्याना
मायेचा कधी
न दिला काही
अन गुरफटलो
विश्वात स्वत:च्या
आत्ममग्न असा काही
की विसरून गेलो
उमजून घेणे
त्यांचे ही
थोडे काही
©️ShashikantDudhgaonkar