Schrödinger चे मांजर

कोठे आहात कसे आहात

विचारतात लोक भेटल्यावर

खरेतर, त्यानां हवे असते

मत आपले

घडलेल्या आणि

घडत असलेल्या घटनांवर

सुचतात मग शब्द

डावे उजवे

सरळ अन वाकडे

उगाच मनाच्या पटलावर

आहोत आणि नाहीही आहोत

सुखात अन दुख:तही आहोत

एकाच वेळी दक्ष आहोत

आणि हरवलेले आहोत

शून्यातही

इथे ही आहोत

तिथे ही आहोत

नको तेथे हजर आणि

हवे तेथे गायब आहोत

थोडक्यात म्हणायचे तर

Schrödinger चे मांजर आहोत

एकाच वेळी जिवंत आणि

त्याचवेळी म्रुत ही आहोत

©️ShashikantDudhgaonkar