इजाजत

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है

ऐकावेसे वाटणारे, गुणगुणावेसे वाटणारे गीत

आजकाल जरा

जास्तच गुणगुणावेसे वाटते

माझे, तुमचे किंवा अजून काहीजणांचे सामान

पता नही कहां, लपून पडलेले आहे

शायद, वळचणीला पडले असेल

कदाचीत, अडगळीत धुळ खात असेल

किंवा घर बदलताना बांधून ठेवलेले

उघडायचेच राहून गेले असेल

ते शोधायची वेळ आली आहे

किंवा निघूनच गेली आहे

असेही म्हणत नाही

पण तरीही करावीशी वाटते

आठवण

त्या अडगळीत पडलेल्या

थोड्याश्या का होईना

शहाणपणाची

©️ShashikantDudhgaonkar