गारठा आजचा आणि कालचा

त्या ऋतूतला गारठा

आतापेक्षा सुसह्य होता

ऊब होती मनांची

अनेक सहवासांची

अन ढणाणलेल्या विचारांनी

पेटलेल्या शेकोट्यांची

मनामनात

असतात आजही शेकोट्या पेटलेल्या

पण, फक्त पाला पाचोळाच असतो

विचारांचा

जळणारा त्यात

गारठा सुसह्य तर होतच नाही

डोळे मात्र पाणावतात

पसरलेल्या धुराने !

©️ShashikantDudhgaonkar