अखेरचा सुर्यास्त

सिमा रेषा आता

ठळक होत चालल्यात

परतू लागलीत गुरे

आपापल्याच कळपात

न संपणारी रात्र

रेंगाळतेय क्षितीजावर

परतणार्या पाखरांचे

थवे पहात

बुडतोय सुर्य

डोंगरात दरीत खाडीत समुद्रात

नजर फिरवाल तेथे

दिसू लागलाय सुर्यास्त

मावळती आता चहू दिशाना

संपवलाय

पश्चिमेचा सुध्दा माज

पहाट नसलेली रात्रीने

©️ShashikantDudhgaonkar