चुकलेले वळण

राहून राहून आठवते

ती रात्र मंतरलेली

तुझ्या नी माझ्या एकमेकाला

चुकवणार्या नजरेची

तरी चोरून एकमेकांकडे

पाहणे काही सोडत नव्हतो

दिवसभर पाठ केलेले

बोलायचे मात्र बोलत नव्हतो

आणि हवा पाण्याच्या पुढे

गाढे सरकवत नव्हते

वेटरने बरेच काही

ठेवले होते समोर

उगाच एखादा तुकडा

चघळत होतो मी

हाताला सुटलेला घाम

पॅंटला पुसत होतो मी

तु बोलत होतीस काहीबाही

मी ही ऐकत होतो

मी बोलत होतो काहीबाही

तू ही ऐकत होतीस

जे बोलायचे ते सोडून

दुसरेच बोलत होतो

हॅाटेल बंद होण्याची

वेळ झाली होती

म्हटल बोलेन परतीच्या प्रवासात

बोलायचे ते सारे काही

पण चंद्र तार्यांवर बोलता बोलता

घीर काही झालाच नाही

बोलायचे ते राहून गेले

ऐकायचे ते ही राहून गेले

आयुष्याच्या वाटेवर

एक वळण घ्यायचे राहून गेले

©️ShashikantDudhgaonkar