
भुक आणि भीती
भुकेपेक्षा भीती जेव्हां मोठी होते
शब्दांची गरज छोटी होत जाते
हक्कासाठी लढणे तर लांबच राहीले
जगण्यासाठी वाकणे सुरू होते
अनिच्छेने का होईना झालेली सुरूवात
सवयीची होते, अंगवळणी पडते
कायमचे वाकल्यामुळे
दिसते पाया जवळचेच थोडेफार
आकाशाकडे क्षितीजाकडे
क्षितीजाच्याही पलीकडे पाहणे
स्वप्नात ही हळू हळू
दुर्लभ होत जाते
दुर्लभ होत राहते
©️ShashikantDudhgaonkar