वावटळ

दुपारच्या रणरणत्या उन्हात

वारा असतो निपचीत

कुठेतरी सावलीला पडलेला

पाखर सुध्दा उडत नाहीत

फांद्या, पान हलत नाहीत

आसंमत सारा, स्तब्ध समाधीत

अन अचानक उठतात

गरागरा फिरू लागतात

धुळीचे लोट उडवत

अनेक वावटळी

कधी छेदतात एकमेकाला

कधी दुर पळतात

आणि विरून जाता जाता

कधी एकदम मोठ्या होतात

मनातल्या आणि उन्हातल्या

सारख्याच असतात

वावटळी

©️ShashikantDudhgaonkar