गंध मातीचा

आठवणीत असून न आठवणारा

प्रत्येक वेळा नवाच वाटणारा

त्या स्तब्ध थबकलेल्या

काही क्षणातच जगणारा

पहिल्या सरीच्या हलक्या स्पर्शाने

सहज फुलणारा

तो गंध मातीचा

आणि ढगाळलेल्या आसमंतात

वार्याच्या मंद झुळूकेवर स्वार होऊन सुध्दा

तिथेच रेंगाळणारा

इथून तिथे उगाच हेलकावे खात

मनाला सुखावणारा

पहिल्या स्पर्शाची आठवण देणारा

मैत्राच्या प्रेमाच्या आणि वासनेच्या

तो गंध मातीचा

©️ShashikantDudhgaonkar