भिजलेले मन

भर दिवसा अंधारलेल्या होते

पावसाच्या धारा दिसत नव्हत्या

वाहणार्या पाण्यात पडणार्या

असंख्य गोल तरंगावरून कळत होते

रिमझिम पाऊस थांबत थबकत

चालूच होता

झाडांच्या पानावर जमणारे

घरंगळून पडणारे मोठाले थेंब

अर्ध्या विजारीत रिसोर्टच्या ओसरीत

चहाचा घोट घेताना दिसणारी

पान्हाळीवरून लागलेली

मोत्यांची धार

डबक्यात स्तब्ध उभ्या असलेल्या

बेडकांच्या पाठीवर पडून

फुटणारे थेंब

घराच्या कौलावर

तबल्याचा ठेका बदलत

वाजणारे सुर

आणि कळत नकळत

ओले झालेले मन

त्या क्षणात रमलेले

हरखलेले

हरवून गेलेले

स्वतः सहित जगाला

विसरून गेलेले

©️ShashikantDudhgaonkar