पुटपूट

स्वतःशीच पुटपूटत

पाहतो आकाशाकडे

नाही काही मागत मी

तुमच्या किंवा त्यांच्या देवाकडे

स्वतःशीच बोलतोय

ऐकतोय आवाज

स्वतःचाच

आसपासच्या गोंगाटात

तेवढेच एक सुखः

©️ShashikantDudhgaonkar