प्रवास

बदलत नाही आकाश

ढगाआड लपलेले

डोंगरदर्या नदीनाले

खाचखळगे आणि राजमार्ग पार करत

उभ्याने कितीही चाललो तरी

आराम करायला

उताणेच पडावे लागते

आणि दिसतात मग तेच तारे

त्याच नेहमीच्या आकाशात

पाठीला तीच जमीन

चादरी पासुन सुरू होऊन

गादी पर्यंत पोहचलेली

पुढे किती आलो, मागे काय राहीले

कमावले किती, गमावले काय

सारेच ठरते मग गौण

रात्रीच्या अंधाऱ्या एकांतात

©️ShashikantDudhgaonkar