
नकोसा एकांत
नकळत येतात
एकटे बसलेलो असताना
कडू गोड खारट आंबट
काही जीभ जाळणाऱ्या तिखट
बऱ्याच आल्या तश्या विरूनही जातात
काही रेंगाळतात, सोबत करतात
काही परत जाण्यास टाळा टाळा करतात
रुतून बसतात वास्तवात गच्च
आठवणी
©️ShashikantDudhgaonkar
नकोसा एकांत
नकळत येतात
एकटे बसलेलो असताना
कडू गोड खारट आंबट
काही जीभ जाळणाऱ्या तिखट
बऱ्याच आल्या तश्या विरूनही जातात
काही रेंगाळतात, सोबत करतात
काही परत जाण्यास टाळा टाळा करतात
रुतून बसतात वास्तवात गच्च
आठवणी
©️ShashikantDudhgaonkar