तरंग

गालावर येऊ पाहणारे हसू

येऊ की नाही या गोंधळात

थबकले होते डोळ्यात

नजर प्रयत्न करत होती

ह्रदयातला कल्लोळ लपवायचा

चेहऱ्यावर असंख्य भावनांची गर्दी

लज्जा हर्ष उल्हास

आणि अनामिक भिती

नितळ पाण्यावर उमटणाऱ्या

असंख्य तरंगासारखी

एकमेकात विरून

एक लोभसवाणा गोंधळ माजवणारी

आणि ती थरारणारी तनू

हळूच बाजूने निघून जाता जाता

ह्रदयात पेरून जाते कळ

हवीहवीशी वाटणारी

आणि धरून ठेवलेला श्वास

सुटलेले जगाचे भान

पुर्ववत होऊ लागते

हळूहळू

काही क्षण खरेच

पाण्यावर उमटणाऱ्या

तरंगासारखेच असतात

सुरू होता होता

संपायला ही लागतात

©️ShashikantDudhgaonkar