शहरी सुर्यास्त

तापलेला लांबलेला दिवस

थकू लागला होता

दगाबाज पानांच्या आठवणींनी

व्याकूळलेले बोडके झाड

पसरू पाहत होते फांद्या

ओसाड आकाशाच्या दिशेने

न दिसणाऱ्या ढगांच्या शोधात

क्षितीज सापडत नसल्याने

दोन इमारतीं मधल्या चिंचोळ्या जागेतून

जमिनीला स्पर्शू पाहणारा सूर्य

आणि रस्त्याचे औटघटकेचे सोबती

त्याच्याच उरावरून वाहने हाकत

पोहचण्याच्या यत्नात

इमारती, बसस्टॅाप, रस्ता आणि मी

स्तब्ध

आपापल्या मुक्कामी

पोहचलेले

©️ShashikantDudhgaonkar