माझे काहीच बिघडत नाही

मी रोज कामाला जातो

घरी येतो घरात रमतो

मित्र परिवारात सूध्दा रमतो

दर आठ पंधरा दिवसांनी

तसे काहीच कमी नाही

हवे ते खातो हवे ते पीतो

फाईव्ह स्टार मधे सुध्दा जेवतो

कोणी खाऊ घालणारा भेटला तर

तसे काहीच कमी नाही

अधे मधे फिरायला जातो

देशातल्या देशात

परदेश वारीचे स्वप्न आहे

होईल ते सूध्दा पुरे कधी तरी

तसे काहीच कमी नाही

दिसतात बकाल वस्त्या

दारिद्र्याने ओसंडून वाहणाऱ्या

चौकाचौकात भिक मागणारे

लहान जीव हात पसरताना

मी गाडीची काच वर करतो

गाण्यांचा आवाज वाढवतो

आणि सरळ पुढे बघत राहतो

विचार न करता

कारण,

माझे काहीच बिघडत नाही

©️ShashikantDudhgaonkar