दिर्घकालीन औषधोपचार, औषध घेण्याचा कंटाळा व आणखी काही




दीर्घकालीन औषधोपचार औषध घेण्याचा कंटाळा व आणखी काही




दीर्घकालीन औषधे घेण्याचा कंटाळा – कारणे आणि उपाय

©️ Shashikant Dudhgaonkar

“मला गोळ्या घ्यायचा खूप कंटाळा येतो” “मला गोळ्या लिहून देऊ नका, मी काही घेणार नाही” – अशा वाक्यांचा अनुभव वारंवार आल्यावर मला वाटू लागले की, गोळ्या घ्यायचा कंटाळा हा एक वैद्यकीय शास्त्राला अजूनही माहीत नसलेला आजार असावा.मग मी पेशंटला समजावतो, दररोज १-२ गोळ्या घ्यायच्या आहेत, पाण्याबरोबर गिळायच्या की संपलं. काही अवघड नाही. पण पेशंट परत नकारार्थी मान हलवतो.

पेशंटला ब्लड प्रेशर, डायबेटीस, अ‍ॅनिमियासारखा आजार असतो ज्यासाठी दीर्घकाळ औषध घेणे गरजेचे असते. काही वेळा आयुष्यभरासाठी. अशा वेळी आम्हा डॉक्टरांची खरी परीक्षा सुरू होते.

मी त्यांना विचारतो, तुम्हाला जेवणाचा कंटाळा येतो का? झोपेचा कंटाळा येतो का? श्वास घेण्याचा कंटाळा येतो का? काही गोष्टी जरी कंटाळवाण्या वाटल्या तरी त्या करणे आवश्यक असते, तसंच औषधेही.

विसरणे आणि त्यावर उपाय

रुग्ण सांगतात – “मी विसरतो”.

  • जेथे जेवण करता तिथे औषधे ठेवा, उदा. डायनिंग टेबल.
  • मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा.
  • औषध आठवण करून देणारी अ‍ॅप्स वापरा.

डायबेटीस किंवा बीपी सुरुवातीला त्रास देत नाही, त्यामुळे त्याच्या गंभीरतेची जाणीव होत नाही. मात्र “रूग्णाने ब्लडप्रेशरची औषधे दोन तिन वर्षं बंद केली व त्याला मेंदूमधे रक्तस्त्राव झाला व पक्षाघाताचा झटका आला” “डायबेटीसची औषधे सात-आठ महीने बंद केली व त्यामुळे पेशंट डायबेटीक कोमा मधे जाऊन त्याला आयसीयू मधे दाखल करावे लागले” असे अनुभव बऱ्याचदा येतात.

महत्वाच्या सूचना

  1. डायबेटीस, बीपी, थायरॉईड, हृदयरोग यांसारख्या आजारांची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नयेत.
  2. औषधे बंद केल्याने बीपी किंवा साखर अचानक वाढू शकते – हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागू शकते.
  3. घरात दहा दिवसांची औषधे उरले की पुढची औषधे दुकानातून विकत घेऊन आणून ठेवा. पुर्णपणे संपायची वाट पाहू नका. औषधे आणायला उशिर झाला तर डोस चुकू शकतो. त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे.
  4. प्रवास करताना थोडी जास्त औषधे बरोबर ठेवा. प्रवास लांबू शकतो अथवा एखादी गोळी वेष्टनातून काढता काढता खाली पडू शकते
  5. औषधे लाकडी कपाटात ठेवा – ऊन व उष्णतेपासून दूर.
  6. डोस किंवा औषध घेण्याची पद्धत डॉक्टरांना न विचारता बदलू नका.
शेवटी एकच: औषध घेण्याचा कंटाळा वैद्यकीयदृष्ट्या चुकीचा आणि धोकादायक ठरू शकतो. कृपया स्वतःची काळजी घ्या.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading