गारठलेले





गारठलेले | मराठी कविता – शशिकांत दुधगांवकर










गारठलेले

जिवंतही असतो मी
मृतही भासतो
आरशात रोज सकाळी जेंव्हा
मी स्वतःला पाहतो

जिवंत असतील लोक इतर
नसतील माझ्या सारखे
भ्रम माझा तुटला जेंव्हा
उघडले तोंड त्यांनी

जिवंत भासते जग जरी
तरी केंव्हाच मेले आहे
जिवंत चित्तेच्या उबेवर स्वतःला
येथे शेकतात गारठलेले

© Shashikant Dudhgaonkar


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading