Posting after a long time. Health issues kept me away from WordPress. Let’s hope I continue.

तिन्हीसांज
तिन्हीसांज उंबऱ्यातून घरात येता येता
बंद दारावर थबकते
एखादे चुकून उघडे असले तरी
जिव गुदमरतो तीचा
आतल्या दिव्यांच्या झगमगाटात
आणि उजेड नसला तरी
स्वागत करायला कोणी मोकळे नसते
टीव्ही मोबाईलच्या जमान्यात
तशीही बऱ्याच लोकांची तिन्हीसांज
कामावरून घरी पोहचता पोहचता कधी संपते
कळत सुध्दा नाही
कधीतरी शहराबाहेर फिरायला गेल्यावर
समुद्रकिनाऱ्यावर डोंगरमाथ्यावर किंवा डोंगरपायथ्याशी
येते ती बिलगायला
खुप दिवसाच्या विरहानंतर भेटणाऱ्या प्रेयसीसारखी
आणि प्रियकराला मोबाईलवर फोटो काढण्यात गुंग पाहून
हिरमुसली होऊन विरून जाते
रात्रीच्या अंधारात
©️ShashikantDudhgaonkar

Best wishes for your recovery Shashi
Thanks Sadje
You’re welcome