पुरचूंडी

My English poem Parcel https://shashisverse.com/2024/02/21/parcel/ is a translation of this Marathi poem. It’s difficult to get the exact essence in translation. But then every language has its own beauty, vocabulary and local contexts. Making each and every one of them uniquely beautiful. Below is my original Marathi poem पुरचूंडी.

पुरचूंडी

सिलसिला मधल्या बच्चन सारखे

तुझ्या कुशीत अलगद विसावून

तुझ्या मोकळ्या केसात गुंतायचे

ठरवायचो मी

राजेश खन्ना स्टाईल मधे

तुझ्या मैत्रीणी समोर

ये शाम मस्तानी, मदहोश किए जाए

तुला ऐकवायचे स्वप्न पहायचे मी

कागदावर खरडलेल्या ओळी पाहून

मित्र म्हणायचे वेडा झालास रे

आणि मी हुरळून जायचो

टिंगलीने ही

काळाची बस पुढे धावत होती

झाडे मागे पळत होती

मात्र क्षितीजावरच्या टेकड्यांसारखी

तू सोबत सोडत नव्हतीस

हळूहळू ती टेकडी देखील

मागे पडत गेली

नवे डोंगर आले आणि गेले

उजेड अंधार संधीप्रकाश

आणि पहाट देखील

एन्ट्री एक्झिट मारत गेले

वेळी अवेळी

विस्तारत चाललेल्या क्षितीजात

जुने सगळेच मागे पडले

आणि फुगू लागले गाठोडे

बऱ्या वाईट

आणि फुटकळ आठवणींचे

त्यात कोठेतरी अगदी तळाला

आपला ताजेपणा न गमावतां

तग धरून आहे अजूनही

आठवणींची एक पुरचूंडी

©️ShashikantDudhgaonkar

2 thoughts on “पुरचूंडी”

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading