यज्ञ

यज्ञ

मी सुख भोगत नव्हतो, मी दूखः उगाळत नव्हतो

जागेपणी झोपून, मी झोपेत जागत होतो

माझे होते खुप, मी खुपजणांचा होतो

तरी तनहाईचा एहसास, मी सहन करत होतो

बाजारात जाणिवांच्या माझेही दुकान होते

विक्री काही नसली तरी, भाडे मोठे होतो

मी नव्हतो आळसावलेला, मी राबत अती नव्हतो

कमवत होते जेवढे, तेवढेच खर्चत होतो

संताप गिळत होतो, मी अश्रू पीत होतो

भावनांच्या सापानां, मी पुंगी ऐकवत होतो

हजार उन्हाळे संपवणाऱ्या, पावसांसारखी तू आलीस

भिजायचे सोडून तेंव्हा मात्र, मी छत्री शोधत होतो

मी सुख भोगत नव्हतो, मी दूखः उगाळत नव्हतो

जागेपणी झोपून, मी झोपेत जागत होतो

©️ShashikantDudhgaonkar

2 thoughts on “यज्ञ”

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading