शंखामधल्या लाटा

शंखामधल्या लाटा

बसणे होत नाही

बसल्याशिवाय बोलता येत नाही

वेळांचा मेळ

काही केल्या जमत नाही

फोनवर म्हणालीस तू

निवांत बसून बोलू

कधी आणि कोठे हे मात्र विसरलीस

नेमके सांगायला

मी सुध्दा विचारायचे विसरलो

गुंग असताना

ऐकण्यात

कळत नाही तूझे शब्द ऐकत असतो

का तूझा आवाज

बोलायचे भरपूर असते पण

सांगता सांगता थबकतो

का ऐकता ऐकता अडवतेस तू

कळत नाही

उद्या निवांत बसून बोलू

तू सहज सांगून जातेस

मी ही ऐकतो

आवडले नाही तरी

आणि तू फोन ठेवला तरी

मी ठेवत नाही

धरतो घट्ट कानावर

भावनांच्या किनाऱ्यावर सापडलेल्या शंखासारखा

आणि ऐकू येणाऱ्या लाटांच्या ध्वनीत

शोधत बसतो

तुझ्या आवाजाचा

हवाहवासा वाटणारा खळखळाट

©️ShashikantDudhgaonkar

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading