उज्ज्वल भविष्य





उज्ज्वल भविष्य | कविता | Shashikant Dudhgaonkar





उज्ज्वल भविष्य

एआय चे भविष्य उज्ज्वल आहे
भाषेचे भविष्य उज्ज्वल आहे
आणि एक एक अनेकांचे भवितव्य सुद्धा
अत्यंत उज्ज्वल आहे
सांगतात थोर मोठे आणि पारंगत लोक
मनस्वी उत्कटतेने
त्यात भर पडते
अद्वितीय आणि अलौकिक
पण स्वयंघोषीत तज्ञांची
नविन काही असले तर
ते मागे थांबत नाहीत
काळाच्या आणि लोकांच्या पुढे धावायची
असते त्यांना फार घाई
रोजच्या मरण्याला
हुरूप येतो थोडासा
आजचा अंधाराला दिसू लागतो
लख्ख उजेड उद्याचा
मात्र हे सगळे दिसण्यापुरतेच
पोपटाचे भविष्य खरे होते का कधी
बाजारात केलेले असो
वा व्यासपीठावरून केलेले असो
आणि वर्तवलेला क्षेत्रात
वर्तवलेला उज्वल काळ येतो
दबलेल्या पावलांनी
लपत छपत
थोड्याफार द्वारावर ठोठावून
आत शिरतो
ज्यांची द्वारे ठोठावली जात नाही
ते मात्र राहतात व्यस्त
चहा बिडीच्या टपऱ्या, भजी वड्याच्या गाड्या
आणि भाड्याच्या गाड्या चालवत
ओला उबर करत
आणि हेही नसले तर
वार्षिक उत्सव आहेतच
बिभत्स नाचायला
आणि निवडणूका असतात
बिर्याणीमध्ये मांसाचे तुकडे शोधायला
दरम्यान उंबरा वाट पाहत राहतो
कोणीतरी धान्याचे माप सांडून ओलांडण्याची
किती दिवस संट्यानी आज बाहेर करून
उंबरे झिजवायचे
लाकडं मिळेनासी झाली
नविन करायला
आणि म्हणतात
उज्ज्वल भविष्यकाळ
वर्तमानात आला
© Shashikant Dudhgaonkar


Leave a Comment

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading