“`
“`
गटारी अमावस्या, दारू, दारूडे आणि व्यसनाधीनता
“`
१. काही महत्वाची आकडेवारी
- National Family Health Survey (NFHS-5) conducted in 2019-2021 च्या डेटा प्रमाणे २२.४ टक्के प्रौढ पुरूष दारू पितात.
- त्यातल्या त्यात ग्रामीण भागात शहरी भागांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.
- दारू पिणाऱ्या पैकी सरासरी ५-६% लोक दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होतात.
२. ती का व्यसनाधीन होतात
- जनुकीय: काही व्यक्तींची जनुकीय रचना अशी असते की ते दारू प्यायला लागल्यास लवकर व्यसनाधीन होतात. अशांनी दारूला स्पर्श केला नाही तर ते व्यसनाधीन होण्यापासून वाचू शकतात.
- सामाजिक-आर्थिक कारणे: अशिक्षित वा कमी शिक्षित असणे, गरीबी, भोवतालची सामाजिक परिस्थिती ह्यांचा व्यसनाधीन होण्यामागे खुप मोठा प्रभाव असतो.
- मानसिक आरोग्य: मानसिक आरोग्य चांगले नसेल उदा. Anxiety, नैराश्य, मानसिक धक्के, ई., हे सुध्दा व्यसनाधीनते कडे वळण्याचे महत्वाचे कारण आहे.
- ADHD: ADHD ग्रस्त व्यक्ती व्यसनाधीन होण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांचे स्वतःवर नियंत्रण कमी असते.
- बालपणातील अनुभव: बालपणी संगोपन चांगले झाले नसेल किंवा फारशी माया वाट्याला आली नसेल तर मोठे झाल्यावर असे प्रौढ व्यक्ती व्यसनाधीन होण्याची शक्यता असते.
Remember becoming addicted is a result of a complex interplay of more than one factor, occurring at one time or in a sequence.
३. दारूचे मेंदूच्या महत्वाच्या भागावर होणारे तात्कालिक परिणाम
- Occipital cortex: त्यामुळे दिसण्यावर परिणाम होतो व निट दिसत नाही.
- Temporal lobe: हा भाग भाषेशी संबंधित असल्यामुळे व्यक्ती अस्पष्ट बोलायला लागते किंवा तीची जीभ जड होते.
- Prefrontal cortex: वर दारूच्या प्रभावामुळे निर्णयक्षमता कमी होते व व्यक्ती लहरी किंवा भावनावश होते.
- डोपामीन स्त्राव: दारू पिल्यावर मेंदूच्या काही भागात डोपामीनचा स्त्राव वाढतो. त्यामुळे व्यक्ती तनावमुक्त होते तीला आनंद वाटू लागतो. त्याचबरोबर आत्मविश्वास सुध्दा चांगलाच वाढतो. (त्याबद्दल बरेच विनोद आहेत)
- Cerebellum: दारू जास्त झाल्यास Cerebellum वर प्रभाव पडतो. शरीराचा तोल राखण्याचे काम Cerebellum करत असते परंतू दारूच्या अमलाखाली हे काम मंदावते व व्यक्तीचा तोल जाऊ लागतो.
४. नियमित पिण्याचे परिणाम
अर्थात रोज रोज दारू पिणाऱ्या व्य्क्तीमधे अजून काही बदल घडतात.
शरीरातील अल्कोहोल बाहेर काढण्याचे काम लिव्हर(यकृत) करत असते. नेहमी दारू पिण्याने यकृताची कार्यक्षमता वाढते व ते लवकर लवकर दारू बाहेर फेकायला लागते. परंतू अतीश्रमूळे यकृत खराब होण्याची शक्यता वाढायला लागते.
महत्वाचे म्हणजे रोज रोज व अती प्रमाणात दारू पिल्यावर दारू पिण्यातला आनंद कमी होत होत पुर्णपणे कमी होऊन जातो. मग तो आनंद मिळवण्यासाठी जास्त प्रमाणात दारू घ्यावी लागते, अशा तऱ्हेने ती व्यक्ती दुष्टचक्रात अडकते.
५. Amygdala आणि Hyperkatifeia
दारूच्या सेवनामुळे amygdala(मेंदूचा एक भाग) बधीर राहतो. Amygdala चे काम म्हणजे नेगेटिव्ह भावना जागृत करणे.
परंतू व्यसनाधीन व्यक्तीने दारू न घेतल्यास त्या व्यक्तीचा amygdala उद्दीपीत (stimulate) होतो व त्यामुळे नेगेटीव्ह भावना त्यांच्या मनात वाढायला लागतात. शेवटी तो हायपरकॅटिफिया ह्या अवस्थेत जातो.
हायपरकॅटिफिया ही एक अतिसंवेदनशील व नकारात्मक भावनिक अवस्था असते ज्यामध्ये:
- अस्वस्थता, चिडचिड
- वेदना (डोकेदुखी वा अंगदुखी)
- झोपे न येणे
- भ्रमीत अवस्था (अंगावर किडे फिरल्याचा भास, त्वचेखाली किडे, कपड्यात साप फिरत असल्याचा भास)
- काही लोकांना फिट किंवा फेफरे सुध्दा येतात
- मज्जारज्जूना नुकसान पोहचल्याने हातापायाला थरकाप भरू लागतो
हे सर्व टाळायसाठी ती व्यक्ती मग दारूचा आसरा घेते कारण दारूच्या अंमलाखाली हा त्रास पुर्णपणे गायब होतो.
अशा तऱ्हेने एक दृष्टचक्र सुरू होते:
दारू न पिल्यास त्रास वाढतो → मग दारू पिणे → अंमल कमी झाला की त्रास वाढणे → मग परत दारू पिणे
६. दिर्घकालीन परिणाम
दारूच्या दिर्घकालीन सेवनामुळे:
- मोटीव्हेशन कमी होते
- स्मृती कमी होते
- निर्णयक्षमता कमी होते
- कामातील कुशलता कमी होते
→ अशा तऱ्हेने त्या व्यक्तींचे जीवन उध्वस्त होऊ लागते.
हे सर्व सांगण्याची तीन कारणे
- दारूच्या आहारी जाऊ नये
- सामाजिक दृष्टिकोन बदलणे: तसेच दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तींबद्दल इतरांची जी तुच्छपणाची भावना असते ती कमी करणे. कारण व्यसनाधीन व्यक्तीला जर सुधारण्यासाठी व त्याला समाजात परत आणण्यासाठी समाजाचा दृष्टिकोन चांगला असावा लागतो. व्यसन हा एक मानसिक आजार आहे व त्यासाठी योग्य उपचारांबरोबर मानसिक आधाराची सुध्दा गरज असते. अर्थात आधार देणे शक्य नसेल तर कमीतकमी दुर्लक्ष करा परंतू व्यसनाधीन व्यक्तीला तुच्छतेची वागणूक देऊ नका.
- सामाजिक समस्या म्हणून ओळख: लक्षात घ्या दारू फक्त वैयक्तिक समस्या नसून ती एक सामाजिक समस्या सुध्दा आहे.
“`
