माय मराठी









माय मराठी – कविता


माय मराठी

माय बोलते आणि बाळ ऐकते
ती मराठी
हाय ! कसा आहेस पासून सुरू होऊन
निघतो आम्ही बाय म्हणत संपणारी
ती सुध्दा मराठी

कल्पनेत वावरणारी आणि स्वप्नात बोलणारी
पुस्तकांतून बाहेर येऊन फळ्यांवर उमटणारी
ती सुध्दा माय मराठी

मायेने शिव्या देत सरळसोट चालणारी
कोल्हापुरी
वरून उग्र भासणारी पण आतून मृदू असलेली
सोलापूरी

सुपारीच्या खांडासारखी कडक पण शब्दाशब्दाला सुगंध फेकणारी
मराठवाडी
कायम आपल्या वेगळ्या ठेक्यात चालणारी
खानदेशी

अल्लड बाळासारखी दुडूदुडू धावणारी
नागपुरी
हापूस आंब्यासारखी गोड असणारी
कोंकणी

तंतूवाद्या सम भासणारी
अहिराणी

घराघरात कार्यालयात
बाजारात रस्त्यावर
तसेच गल्ली गल्लीतल्या भांडणामधे
मुक्तपणे संचार करणारी

मनातला राग
आणि हृदयातील कोवळे भाव व्यक्त करणारी
माय मराठी


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading