Have added the English translation of this Marathi poem below

राख
नदी करते गोळा
फुले फळे पाला पाचोळा
आणि बरेच काही
वाहता वाहता
मानव सुध्दा मागे नसतो
एक फरक मात्र असतो
आपल्यात आणि नदीमधे
आपण कचरा गोळा करतो
करत राहतो
आयुष्य जगता जगता
जगणे अवघड असते
क्षणोक्षणी आणि वर्षानूवर्षे
आयुष्याशी झगडतां झगडतां
शरीर नक्कीच झीजते
कदाचित
विचार आणि भावना सुध्दा
आणि सत्य असत्य
अर्धसत्य आणि अल्पसत्य
हवे तेंव्हा
क्षणात उप्लब्ध होत असताना
हातातल्या मोबाईलवर
आपण करतो गोळा
निवडूण कचरा
पुर्वग्रहांचा हेवादव्यांचा
आणि विद्वेषाचा
आणि पेटवून आग
आपल्या मनात
पसरवतो राख
जमेल तेथे
जमेल तेव्हा
©️ShashikantDudhgaonkar
Ashes
A river gathers
Grass leaves branches
Flowers and fruits
On its way
To end in the sea
Humans too do that
But there’s a difference,
Between us and the river,
We tend to gather trash
In our journey
Till death
Day to day living
And surviving
For years together
The wear and tear
Degrades our bodies
Perhaps,
Even our thoughts and emotions
And when
Truth is available
When needed
At a finger touch
On our mobiles
We selectively gather
Garbage and trash
Of prejudices and biases
And hatred
Igniting fires in minds
And spreading ashes
Whenever
And wherever possible
©️ShashikantDudhgaonkar
