वाळवंट | Deserts
मोकाट कुत्री, कोंबड्या, बकऱ्या
आणि देखण्या कबूतरांनाही
असतो वाली
कोणी ना कोणीतरी
संवेदनशील आहेत बरेच
समाजात अजूनही
कौतूकास्पद आहे
टिंगल होत असली तरी
आटतो करूणेचा झरा मात्र
क्षणात एका
तुच्छतेने भारलेल्या
आणि विखाराने तापलेल्या
दग्ध रेतीत
हळूहळू पसरत
वाढवू लागलेत आपला विस्तार
अथांग वाळवंटे
मानवी मनातील
क्षणोक्षणी
deserts
stray dogs, hens, and goats
even geese and pigeons
find protectors,
someone, somewhere.
tender souls still breathe
within society
a trait to be admired,
though sadly mocked
by keyboard warriors.
yet this stream of compassion
loses itself
when it comes to humans,
drying out
in scorched sands
of contempt and hate.
slowly, silently,
stretching their expanse,
within human hearts
spread deserts
endless and bare.
