वेदना टोचते जाळते

बधीर करते

आकांत करते

मोठयाने

कधी न बोलतां

डोळ्यांतून

ओसंडून वाहते

शांतपणे

अन उरते मागे

फक्त रितेपण

न भरणारे

कशानेही

कधी तेही जाणवत नाही

जेंव्हा असते साथ

वेदनांचीच

जन्माभर

©️ShashikantDudhgaonkar