संपत चालली माणुसकी

फेसबूक व्हाट्सॲप च्या जमान्यात

सवंग चटपटीत

फेकाफेकीच्या दिवसात

इकडून उचल तिकडे आपट

तिकडून इकडे उचलून टाक

कधी कधी उमाळा आपलाच

फेसबूक चौकात मांड

उल्हास पाहून रड दुसर्यांचा

आणि अश्रू वाचून हास

पेटवणारे वाचून पेट

आतून जळायला लाग

वांझोट्या वादांवर

हजारो शब्द ओत

कधी आपलाच झेंडा

घेऊन बेभान नाच

पण बघू नाकोस सभोवताल

लपलेली दुनिया

आसपास असणार्या

माणसा माणसात

बघू नकोस भावनांनी

ओसंडून वाहणारी दुनिया

आसपास वावरणार्या

माणसा माणसात

फुकाचा डामडौल आणि

फुकाच्या अंहकारात

संपत मात्र चालला माणूस

संपत चालली माणूसकी

©️ShashikantDudhgaonkar