हरवलेले क्षण

कोसळून गेलेल्या पावसासारखे

गेलेले क्षण

परत काही येत नाहीत

निरभ्र आकाशात उंचावर भटकणार्या

एकुलत्या एका ढगांसारखे

जात ही नाहीत मनातून कायमचे

आठवत राहते छळत राहते

गमावलेली संधी

जिवंतपणा जगण्याची

वाट मात्र चालतच असते

दाट धुक्यात

जगण्याच्या अस्तित्वाच्या

उरतो फक्त दमटपणा

अंगाला चिकटणारा

कधीही न जाणारा

मग थिजलेल्या नजरेने शोधत राहतो

राहिलेल्या उरलेल्या क्षणात

जगण्यासाठी काहीतरी

©️ShashikantDudhgaonkar