ओढ

कधी काळी थांबत असे मी वाटेवर

रोज तुझ्या येण्याजाण्याच्या

कधी तू दिसायची

अन मनात अनेक तांबूस सुर्य

उगवायचे एकाच वेळी

नाही दिसलीस तरी आशेच्या चांदण्या

चमकत रहायच्या निरभ्र मनात

वाट पाहण्याची सुध्दा

एक वेगळीच नशा असते

तूला मी कदाचीत आठवत ही नसेन

तूझ्या जगण्याच्या परिघा बाहेरचे माझे अस्तित्व

कधीच तो परिघ लांघू शकले नाही

तो काळ केंव्हा सरला कळलेच नाही

ती वाट ही विरून गेली असेल

त्या काळातील अनेक आठवणी सुध्दा

धुसर झाल्या आहेत

आयुष्याच्या संधीप्रकाशात

ती ओढ मात्र अधून मधून

अजूनही उसळून येत असते

त्याच आवेगाने

©️ShashikantDudhgaonkar