किनारकरी
मारावी उडी की बुडवावे पाय का दुरूनच पहावा नदीचा प्रवाह ह्याच विचारात कायमचे वाहत राहतात किनारकरी ©️ShashikantDudhgaonkar
मारावी उडी की बुडवावे पाय का दुरूनच पहावा नदीचा प्रवाह ह्याच विचारात कायमचे वाहत राहतात किनारकरी ©️ShashikantDudhgaonkar
सांयकाळी बसले होते आपल्याच तंद्रीत तल्लीन झालेले अंतराळविश्वात सोबतीला एक ग्लास खास ठेवणीतला रिकामी बाटली सोफ्यावर लवंडलेली प्लास्टीकच्या प्लेटीतले कुसकरलेले पापड चुरगळलेलला सदरा हिरमुसलेली विजार उगाच हाताने कुरवाळणे केसांना असलेल्या नसलेल्या मधेच गालावर फिरवणे हात अन हसणे खुदकन आपल्याच विनोदावर अचानक आठवलेल्या येवढ्यात आतून येतो आवाज आतून म्हणजे स्वयंपाकघरातून बस झाल आता आणि घ्या गिळून … Read more
खडतर हा प्रवास वळणांनी भरलेला मैलोमैल खडकाळ कडक उन्हातला पान सुध्दा नाही सावली साठी नदी नाही ओढा चढ सुध्दा संपत नाही संपत आलाय शिधा मोकळी गाठोडी थेंबा थेंबासाठी आता हमरातूमरी दमले भागले वाटाडे रागावलेत खूप मागच्यांवर खापर फोडत शमवतात भूक भुतकाळाचे दाखले देत वाजवतात सूप उज्वल भविष्याचे डोळसांनी झाकले डोळे शहाणे झालेत वेडे पण तरीही … Read more
वेदना टोचते जाळते बधीर करते आकांत करते मोठयाने कधी न बोलतां डोळ्यांतून ओसंडून वाहते शांतपणे अन उरते मागे फक्त रितेपण न भरणारे कशानेही कधी तेही जाणवत नाही जेंव्हा असते साथ वेदनांचीच जन्माभर ©️ShashikantDudhgaonkar
नाती असतात नदीसारखी वाहणारी ताजीतवाणी कधी असतात तळ्या सारखी थबकलेली थांबलेली कधी असतात डोह खोल व निर्वीकार कधी समुद्रा सारखी अथांग चहुबाजूला पसरणारी कधी अवखळ झर्या सारखी पावसाळ्यात उगवणारी खट्याळ खिदळणारी कधी पावसासारखी बेभान कोसळणारी भिजवणारी थिजवणारी तर कधी असतात नाले आसपास वाहणारे मैला घेऊन येणारे मैला घेऊन जाणारे ©️ShashikantDudhgaonkar
कधी असतेस पाऊसकधी होतेस तुफानकधी करतेस वीजां सांरखारौद्र कडकडाटकधी नुसतीच ढगाळअंधारलेले आकाशतर कधी असतेस प्रखरटोचणारा प्रकाशकधी असतेस बोचरीथंडगार हवातर कधी पुनवेचाशितल चंद्रमारूप खरे कधीतरीतुझेच दिसू देगालावरती निरागस हसू येऊ देनको फवारे शब्दांचेनको अलंकारक्षण अबोल मायेचे पुरे दोन चार ©️ShashikantDudhgaonkar
मीच अखेर सावरतोमाझ्या स्वत:लाआवरतो विखूरलेल्यामनाची कस्पटेटोचणारे बोचणारेतोडणारे मोडणारेवाटेत आपल्यालाअसंख्य भेटतातकाही आपल्या बरोबरचचालत ही असतातकधी वाटते धरावीवाट वेगळीसोडावी कासअन आस सुखाचीपण प्रवास मात्र जवळ जवळसंपतच आलायहोईल सुरू रात्रकधी ही अंधारीअन ओरबाडणारे थांबतीलकदाचित अंधारात तरी©️ShashikantDudhgaonkar