Schrödinger चे मांजर

Schrödinger चे मांजर कोठे आहात कसे आहात विचारतात लोक भेटल्यावर खरेतर, त्यानां हवे असते मत आपले घडलेल्या आणि घडत असलेल्या घटनांवर सुचतात मग शब्द डावे उजवे सरळ अन वाकडे उगाच मनाच्या पटलावर आहोत आणि नाहीही आहोत सुखात अन दुख:तही आहोत एकाच वेळी दक्ष आहोत आणि हरवलेले आहोत शून्यातही इथे ही आहोत तिथे ही आहोत नको … Read more

आत्ममग्न

आत्ममग्न भाव डोळ्यातले कधी न कळले ना शब्दावाचून वळले काही अबोल त्यांची माया मजला कधी न कळली उमगली नाही असणेही त्यांचे माझ्यासाठीच समजूत माझी मी केली इतकी की मी प्रतीसाद त्याना मायेचा कधी न दिला काही अन गुरफटलो विश्वात स्वत:च्या आत्ममग्न असा काही की विसरून गेलो उमजून घेणे त्यांचे ही थोडे काही ©️ShashikantDudhgaonkar

पानगळ

पानगळ पडू लागली ओली पावले आभाळातून धारांची नाजूक नक्षी मातीवरती उठू लागली थेंबांची ओली माती हिरवी पाती लहान मोठी गोल लांबोळी नाचू लागली सारी पाने थेंब थेंबांच्या ठेक्याने हरकून गेली झाडेझुडूपे स्तब्ध निशब्द व्रूक्ष झाले ओढून बुरखा धारांचा भिजू लागले रस्ते सारे ओघळ धारा वाहू लागल्या फुटेल त्याना वाट जिथे नवजन्माच्या आनंदाने सुचे न त्याना … Read more

रूळलेल्या वाटा

रूळलेल्या वाटा रूळावरच्या रूळलेल्या वाटा तेच थांबे तोच फाटा तेच बघणे त्याच खिडक्यातून त्याच मोक्याच्या जागेवरून अट्टाहासाने अडवलेल्या हे नाही तर, ते ही नाही असे नाही तर, तसेही नाही सवय परिपाठ समजूती भिंती मनाभोवती बांधलेल्या रुळांवरून खाचखळग्यात कधीतरी उतरेल वाट कदाचीत एकाद्या नव्या जगात तोल साधत स्वार व्हायचे धुंद होऊन वारे झेलायचे का फरफटत जायचे … Read more

हरवलेले क्षण

हरवलेले क्षण कोसळून गेलेल्या पावसासारखे गेलेले क्षण परत काही येत नाहीत निरभ्र आकाशात उंचावर भटकणार्या एकुलत्या एका ढगांसारखे जात ही नाहीत मनातून कायमचे आठवत राहते छळत राहते गमावलेली संधी जिवंतपणा जगण्याची वाट मात्र चालतच असते दाट धुक्यात जगण्याच्या अस्तित्वाच्या उरतो फक्त दमटपणा अंगाला चिकटणारा कधीही न जाणारा मग थिजलेल्या नजरेने शोधत राहतो राहिलेल्या उरलेल्या क्षणात … Read more

कवितेचे झाड

कवितेचे झाड कवितेच्या सावलीत कधी बसावेसे वाटते पहुडावे वाटते हिरव्या गवतावर असंख्य शब्दांच्या वेचावी अलगद अलंकाराची फुले पहावी पाने फुले भाव भावनांची आसपास हेलकावे खात तरंगणारी कधी गवतावर उतरून शब्दात गुंफणारी कवितेच्या पण कविताच ती कधीतरीच बहरते तशी ती वैराण माळावर सुकलेल्या पिवळ्या गवतात वठलेल्या झुडूपासारखीच असते खरे तर वास्तवात ती तशीच असते वणव्यात होरपळणारी … Read more

मुंबई स्पिरीट

मुंबई स्पिरीट गुढरम्य अर्थ त्यांच्या जगण्याच्या धडपडीत आणि मरणासन्न जगण्यात चैतन्य शोधणारे अपरिहार्यतेला त्यांच्या जिद्द म्हणणारे सहनशिलतेला त्यांच्या देवत्व देणारे कोसळलेल्या घरा बाहेर मेलेल्या मढ्यावर भेसूर रडण्यातही शोधतात दुर्दम्य आशावाद ©️ShashikantDudhgaonkar

वडाच्या पारंब्या

वडाच्या पारंब्या स्वत:ला आवडणारे पटणारे नितीमुल्ये रितभातीतच्या चाळणीत बसणारे न बसणारे खरच करतो का काही आपण का फसवतच असतो स्वत:ला आपण रोजच्या रोज मुखवटे चढवून शिरतो भुमीकेत स्वत:ला विसरून पुर्णपणे आणि दिसले जर चेहरे सभोवताल मुखवट्यावाचून फिरणारे मुखवट्याच्या आतच कुढत राहतो आपण घेतो बांधून वडाच्या झाडासारखे पारंब्या सोडून ढीगभर मग बघत राहतो आकाशात ढगांकडे पक्षांकडे … Read more

वाडा मनाचा

वाडा मनाचा सोसतच असतो वाडा पडका मनाचा वारा कधी पाऊस कधी आग ओकणारे उन आतून बाहेरून भाजून काढणारे तर कधी तुफान उध्वस्त करणारे उधळून लावणारे इमले सारे भाव भावनांचे आठवणींचे रचलेले वेचलेले जपून ठेवलेले भिंतीतल्या देवळीत पालपाचोळ्या सारखे उडत जाते वावटळी बरोबर परत कधीच न दिसण्यासाठी पण कधीतरी दरवळते रातराणी दिवसाही कधीतरी हळूवार झुळूक वाहते … Read more

संपत चालली माणुसकी

संपत चालली माणुसकी फेसबूक व्हाट्सॲप च्या जमान्यात सवंग चटपटीत फेकाफेकीच्या दिवसात इकडून उचल तिकडे आपट तिकडून इकडे उचलून टाक कधी कधी उमाळा आपलाच फेसबूक चौकात मांड उल्हास पाहून रड दुसर्यांचा आणि अश्रू वाचून हास पेटवणारे वाचून पेट आतून जळायला लाग वांझोट्या वादांवर हजारो शब्द ओत कधी आपलाच झेंडा घेऊन बेभान नाच पण बघू नाकोस सभोवताल … Read more