प्रवास

प्रवास बदलत नाही आकाश ढगाआड लपलेले डोंगरदर्या नदीनाले खाचखळगे आणि राजमार्ग पार करत उभ्याने कितीही चाललो तरी आराम करायला उताणेच पडावे लागते आणि दिसतात मग तेच तारे त्याच नेहमीच्या आकाशात पाठीला तीच जमीन चादरी पासुन सुरू होऊन गादी पर्यंत पोहचलेली पुढे किती आलो, मागे काय राहीले कमावले किती, गमावले काय सारेच ठरते मग गौण रात्रीच्या … Read more

इस्त्री

इस्त्री शर्टावर नेहमीप्रमाणे इस्त्री फिरवताना पाहत होतो सुरकुत्या अद्रुश्य होताना उरत होता नितळपणा हवाहवासा वाटणारा अंगाला उबदारपणे अलगद बिलगणारा आणि मग उगाच आठवल्या असंख्य सुरकुत्या आयुष्याला पडलेल्या ©️ShashikantDudhgaonkar