इस्त्री

इस्त्री

शर्टावर नेहमीप्रमाणे इस्त्री फिरवताना

पाहत होतो सुरकुत्या

अद्रुश्य होताना

उरत होता नितळपणा

हवाहवासा वाटणारा

अंगाला उबदारपणे

अलगद बिलगणारा

आणि मग उगाच आठवल्या

असंख्य सुरकुत्या

आयुष्याला पडलेल्या

©️ShashikantDudhgaonkar

1 thought on “इस्त्री”

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading