लाॅकडाऊन

बसून बसूनसुजलेत गुढगेझोपून झोपूनभनाणलय डोस्केटिव्ही बघूनबघायचा कितीबागेला पाणीओतायच कितीझोपेत सुध्दाचावळतात हातसावरायलानाकावरचा मास्कसगळ्याची नाकवाटतात चपटीकानाची तर केंव्हाचझालीय खुंठी.पण आजकाल मलाजरा वेगळीच भीतीउगवली असेलका मागे शेपटी.©️shashikantdudhgaonkar